झलक नव्या गाड्यांची
सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. म्हणूनच या वर्षाच्या अखेरपर्यंत तसंच नव्या वर्षाच्या सुरुवातीला वाहन उत्पादक कंपन्या नव्या गाड्या बाजारात घेऊन येणार आहेत. या गाड्या 10 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असतील. या गाड्यांवर एक नजर..
रेनो क्लिओ
रेनोच्या क्लिओची किंमत 7 ते 10 रुपयांदरम्यान असेल. ही कार अद्याप भारतात दाखल झालेली नाही. भारतात आपला विस्तार करण्यासाठी कंपनी नवी गाडी बाजारात आणणार आहे.
काय आहे फीचर्स
इंजन : 1.2 लीटर
पावर : 100 बीएचपी
टॉर्क : 145 एनएम...
टोयोटा कोरो
भारतात टोयोटा कोरोला गाडी उपलब्ध आहे. पण आता कंपनी विओस ही नवी गाडी घेऊन येणार आहे. या गाडीचं इंजिन 1.4 लीटरचं असेल.
काय आहे फीचर्स
इंजन : 1.4 लीटर
पावर : 87 बीएचपी
टॉर्क : 205 एनएम...
मारुती बलेनो आरएस
बलेनोचं यश पाहून मारूती बलेनो आरएस ही नवी गाडी बाजारात आणणार आहे. याची किंमत 7.50 लाख रुपयांपासून 9 लाख रुपयांदरम्यान असेल.
काय आहे फीचर्स
इंजन : 1.2 लीटर
पावर : 83 बीएचपी
टॉर्क : 115 एनएम
टाटा नेक्सॉन
टाटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात आणणार आहे. ही गाडी 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत असेल. मारूतीच्या विटाराला टक्कर देण्याचा टाटाचा प्रयत्न आहे. टाटा नेक्सॉन लोकप्रिय ठरेल, असा अंदाज व्यक्त होतोय.
काय आहे फीचर्स
इंजन : 1.3 लीटर
पावर : 90 बीएचपी
टॉर्क : 200 एनएम...
रेनो कापटूर...
रेनो कापटूर नावाची कार बाजारात घेऊन येणार आहे. डस्टरनंतर ही एसयूव्ही बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार आहे. तिची किंमत 7 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.
काय आहे फीचर्स
इंजन : 1.6 लीटर
पावर : 103 बीएचपी
टॉर्क : 150 एनएम...
