1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

टाटा इंडिका, नॅनो महागणार?

टाटा इंडिका
WD
WD
कच्च्या मालाच्या किंमतींत सातत्याने वाढ होत असल्याने कंपनीवर दबाव वाढत असल्याने टाटा मोटर्सने आपल्या उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅनोची किंमत वाढणार का? हे अद्याप अनिश्चित असून, कंपनी लवकरच याची घोषणा करणार आहे.

कंपनीचे प्रबंध संचालक प्रकाश एम तेलंग यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टीलच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशाही काळात कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत.

आगामी काळात उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा कंपनीचा मानस असून, यासाठी कोणताही कालावधी अद्याप निश्चित करण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.

कंपनीची नॅनो आणि टाटा इंडिका या गाड्यांची मोठी मागणी असून, या दोनही गाड्या सामान्यांच्या गाड्या म्हणून समजल्या जातात.
About Writer
वार्ता