डेलायट भारतात भरती करणार
जागतिक सल्लागार कंपनी डेलायटने आगामी तीन वर्षात भारतात चार हजार जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम क्विंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कंपनीत 11 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आगामी तीन वर्षात त्यांची संख्या 15 हजारांवर नेण्यात येणार असून, यासाठी चार हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
मंदीच्या काळातही कंपनीने भारतात चांगला व्यवसाय केला असून, यामुळे कंपनीच्या आशा अधिक बळावल्याचे ते म्हणाले.