नवीन वर्षातही डाळ महागणार?
WD
WDआंतरराष्ट्रीय बाजारात डाळीच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय बाजार नव्या वर्षात याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे.
भारतीय बाजाराचा विचार करता एका वर्षात तुरीच्या डाळीची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. उडदाची डाळ 46 रुपयांनी वाढत 77 रुपयांवर गेली आहे. बाजारात मूग डाळ सध्या 83 रुपया किलोच्या आसपास मिळते. एका वर्षापूर्वी मूग डाळ 45 रुपये किलोत मिळत.
आजघडीला देशात 1.8 ते 1.9 कोटी टनपर्यंत डाळीची मागणी आहे. उत्पादनाचा विचार करता देशात 1.4 ते 1.5 कोटी टन पर्यंत डाळ उत्पादन केले जाते. देशातील बाजारपेठेतील मागणी वाढल्याने सरकार सध्या कॅनडा, म्यानमार आणि ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणावर डाळ आयात करते.

