Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 28 डिसेंबर 2009 (14:05 IST)
बाल्कोतील गुंतवणुकीची कागदपत्र 'गायब'
छत्तीसगडच्या कोरबा येथील भारत एल्युमिनियम कंपनी (बाल्को) मध्ये आठ वर्षांपूर्वी गुंतवण्यात आलेल्या 551.5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकी संदर्भातील कागदपत्र गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. माहितीच्या अधीकाराखाली मागितलेल्या माहितीनंतर माहिती खात्याच्या निदर्शनासही बाब आली.
बाल्कोत सरकारची 51 टक्क्यांची भागिदारी आहे. या संदर्भात माहिती अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली होती. स्टरलाइट इंडस्ट्रीजने मार्च 2001 मध्ये बाल्कोतील 51 टक्क्यांची भागिदारी सरकारकडून विकत घेतली होती.