भारती-एमटीएन करार मोडला
मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेली भारती-एमटीएन चर्चा फिसकटल्याने भारती एअरटेलचे जगातील तिसरी सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनण्याचे स्वप्न मोडले आहे. दस्तूरखुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या कराराबद्दल उत्सुकता दाखवली होती.
दक्षिण आफ्रिकी कंपनी असलेल्या एमटीएनचे अधिग्रहण करण्याचे प्रयत्न भारतीने सुरू केले होते. अनेक अडचणींना पार करत अखेरच्या टप्प्यात ही चर्चा आली होती. हा करार कोणत्याही परिस्थितीत करणारच असे भारतीने ठरवले होते. परंतु भारतीच्या या स्वप्नाला ग्रहण लागले.
मागील दोन वेळा चर्चेचा कालावधी पुढे ढकलण्यात आला होता. बुधवारी या चर्चेचा कालावधी संपल्यानंतर आणखी एक वेळा हा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
भारतीने बुधवारी रात्री पत्रकारपरिषद घेत चर्चा फिसकटल्याचे स्पष्ट केले. आफ्रिकी सरकारनेही हा करार फिसकटल्याचे मान्य करत तूर्तास यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.