1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
  6. यामहाची महागडी बाइक बाजारात

यामहाची महागडी बाइक बाजारात

देशातील सर्वात महाग दुचाकी आज यामहाने बाजारात उतरवली आहे. कंपनीच्या 'व्हीमॅक्स' या गाडीची किंमत 20 लाखांवर आहे. कंपनीने एफझेड प्रकारातील तीन मॉडेल बाजारात लॉंच केले असून, या गाड्यांनाही ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद लाभेल अशी आशा कंपनीचे प्रबंध संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी युकी मीने यांनी व्यक्त केली आहे.

ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या दुचाकीच्या विक्रीत 80 टक्क्यांची वाढ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. व्हीमॅक्स गाडीचे इंजिन टाटा इंडिका कारच्या इंजिनापेक्षाही बलवान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.