बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: जमशेदपूर , मंगळवार, 29 डिसेंबर 2009 (13:48 IST)

व्याज दर वाढणार नाहीत- भट्ट

व्याज दर वाढणार नाहीत भट्ट
WD
WD
देशातील बँकांकडे मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असल्याने आगामी सहा महिन्यांपर्यंत तरी देशातील बँकांच्या व्याज दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष ओ पी भट्ट यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या बँकेकडे मुबलक प्रमाणात लिक्विडीटी आहे. कर्ज वाटण्याचा कोणताही दबाव बँकांवर नाही. महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार व्याज दरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे मान्य करत हा सरकारचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

बँकांचे विलिनीकरण झाल्याने बँकांची स्थिती आणखी मजबूत होणार असल्याचे भट्ट यांनी स्पष्ट केले.