सोने 17000 हजारांवर जाणार
आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी सातत्याने वाढत असल्याने देशातील बाजारात सोन्याची चकाकी वाढत असून, आगामी आठवड्यात सोने 17 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतीय बाजारात दहा ग्रॅम सोन्याची किंमत 16900 आहे.
अमेरिकेत सोन्याचे दर 1099 डॉलर प्रती औंसवर गेले आहेत. तर भारतीय बाजारात सोने 75 रुपयांनी वधारत 16900 रुपयांवर गेले आहे. 17 हजारांचा पल्ला गाठण्यासाठी सोन्याला केवळ 100 रुपयांची गरज असून, आगामी आठवड्यात सोने हा पल्ला गाठेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सोने वधारले असले तरी चांदीच्या दरात मात्र 70 रुपयांची घसरण दिसून येत आहे. चांदी 27185 रुपये किलोवर बंद झाली.