1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोने आणि चांदीचे दर घसरले

जागतिक आर्थिक मंदीची झुळूक पुन्हा एकदा बाजारात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. सोने 250 रुपयांनी घसरत 17, 110 रुपये तोळ्यांवर आले आहे.

डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्यानेही सोने 1130 डॉलरने घसरत 1108.30 डॉलर प्रती तोळ्यांवर आले आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात 450 रुपयांची घसरण झाल्याने चांदी 27,450 रुपयांवर आली आहे. (हे दर सहा किलोंसाठी आहेत.)

मंदी आणि डॉलरमुळे उभय धातूंच्या दरात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मागील महिन्यात सोने 18 हजारांवर गेले होते.