1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

सोने महागले

सोने महागले
सणवार आणि गुंतवणुकदरांचा ओढा वाढल्याने राजधानी दिल्लीतील बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 16 हजारांवर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता सोने एक हजार डॉलर ओंसवर गेले आहे. अमेरिकी बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यास त्याचा प्रत्यक्षात परिणाम भारतीय बाजारातही दिसून येतो.

आगामी काळात लग्नाचा सिझन असल्याने देशातील बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. राजधानी दिल्लीतील बाजारात सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅमसाठी 16 हजार रुपयांवर पोहचल्याने सामान्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्या आहेत.

सोन्या पाठोपाठ चांदीच्या किंमतीतही एक हजार रुपयांची वाढ दिसून आली. आजपासून पक्षपंधरवाडा सुरु होत असल्याने शुक्रवार आणि शनिवारी भारतीय बाजारात सोने-चांदीची जोरदार खरेदी करण्यात आली.