1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोन्याची मागणी घसरणार?

WD
WD
सोन्यातील गुंतवणूक वाढल्याने जगभरात सोन्याची मागणी वाढली आहे. आगामी वर्षात याचा विपरीत परिणाम होणार असून, सोन्याची मागणी त्याच्या वाढत्या किमतीमुळे घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डब्ल्यूजीसीचे संचालक अजय मित्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांमध्ये सोन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. मागणी वाढल्याने सोन्याचे दरही वाढले असून, आगामी काळात सोन्याचे वाढते दरच मागणीवर परिणाम करू शकतात.

भारत आणि चीनमध्ये मात्र याचा कमी प्रभाव दिसून येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. जगभरातील इतर कोणत्याही बाजारांच्या तुलनेत या दोन देशांच्या बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा परतत असल्याचे दिसून येत असल्याचे मित्रा यांचे म्हणणे आहे.