1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोन्याचे दर पुन्हा वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुन्हा एकदा वाढल्याने सोन्याचे दर 110 रुपयांनी वाढत 17110 रुपये तोळा इतके झाले आहेत. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने 16 हजारांखाली गेले होते.

एक महिन्यांच्या घसरणीनंतर न्यूयॉर्क बाजारात सोने 15.30 डॉलरने वाढत 1112.40 डॉलरवर गेले. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र 370 रुपयांची घसरण झाल्याने चांदी 27280 रुपये किलोवर बंद झाली आहे.