1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोन्याला 440 चा झटका

सोन्याला 440 चा झटका
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची चकाकी आता हळूहळू कमी होत आहे. भारतीय बाजारालाही हीच लागण झाली असून, सोन्याच्या भावात अचानक 440 रुपयांची घसरण झाल्याने सोने (एक तोळे) 17, 360 रुपयांवर आले आहे.
WD
WD

यापूर्वी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याचे दर 510 रुपयांनी घसरले होते. चालू वर्षातील ही सर्वात मोठी घसरण होती. मागील वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्याने सोने 18 हजारांपर्यंत गेले होते.

मागील पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1, 260 रुपयांनी घसरले आहे. डिसेंबर महिन्यात सोने 18, 550 रुपयांवर गेल्यानंतर देशातील सोन्याची गुंतवणूक वाढली होती.
About Writer
भाषा