रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (22:07 IST)

‘पावनखिंड’बॉक्स ऑफिसवर हिट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  सध्या तिकीटबारीवरही याची जोरदार कमाई सुरु आहे. लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगितले आहे.
 
“मराठी चित्रपट पावनखिंड हा हिट ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. पहिला आठवडा – १२.१७ कोटी, आठवड्याच्या शेवटी – शुक्रवार १.०२ कोटी, शनिवार १.५५ कोटी, रविवार १.९७ कोटी…. एकूण – १६.७१ कोटी”, असे तरण आदर्श या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉट शेअर करत दिग्पाल लांजेकर यांनी ‘हर हर महादेव’ असे म्हटले आहे.