प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी 27 चित्रपटांना8 कोटी 65 लाख रुपये – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

amit deshmukh
Last Modified बुधवार, 29 जून 2022 (20:54 IST)
मुंबई, : चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या एकूण 23 चित्रपटांसाठी तसेच 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि

इतर 2 चित्रपट अशा एकूण 27 चित्रपटांकरिता प्राथमिक टप्प्यात 8 कोटी 65 लाख रुपये इतक्या रकमेचे अनुदान संबंधित निर्माते/ निर्मितीसंस्था यांना धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अमित देशमुख यांनी दिली आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे मराठी चित्रपट निर्मात्यांना देण्यात येणारे अनुदानाचे वाटप याबाबतचा विषय महामंडळाच्या संचालक बैठकीत घेण्यात आला होता. त्यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी संबंधितांना अनुदान वाटपासंदर्भातील सूचना दिल्या. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत महामंडळाकडे अर्थसहाय्यासाठी प्राप्त झालेल्या चित्रपटांपैकी 55 चित्रपटांचे परीक्षण 5 जानेवारी 2022 ते 8 जानेवारी 2022 या काळात, 10 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2022 आणि 17 जानेवारी 2022 ते 21 जानेवारी 2022
या काळात
शासनाने गठित केलेल्या चित्रपट परीक्षण
समितीकडून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी मुंबई येथे करण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार “अ” दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता 40 लाख रुपये इतके अनुदान आणि “ब” दर्जा प्राप्त चित्रपटांकरता 30 लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परीक्षणाअंती ज्या चित्रपटांना 71 च्या पुढे गुण असतील त्यांना “अ” दर्जा व 51 ते 70 गुण असणाऱ्या चित्रपटांना “ब” दर्जा देण्यात येतो. ज्या चित्रपटाला 51 पेक्षा कमी गुण मिळतील तो चित्रपट अपात्र असेल व त्यास कोणतेही अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार नाही असे निकष ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार / आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परीक्षणाशिवाय आपोआपच “अ” दर्जा बहाल होतो मात्र चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता होत असल्यास त्यास “अ” दर्जा प्रमाणे अर्थसहाय्य लागू होते.
27 नोव्हेंबर 1997 च्या शासन निर्णयानुसार दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या मूळ शासन निर्णयामध्ये 30 ऑक्टोबर 2013 आणि 8 ऑगस्ट 2018 अन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 30 ऑक्टोबर 2013 आणि 3 मे
2013 रोजी किंवा त्यानंतरच्या दिनांकास जे मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्ड प्रमाणित होतील अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनी एक हजार रुपये किंवा वेळोवेळी शासन निश्चित करेल एवढे शुल्क जमा केल्यानंतर अर्थसहाय्याचा विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. 3 मे 2013 पूर्वी सेन्सॉर बोर्ड प्रमाणित होणारे मराठी चित्रपट जुन्या योजनेप्रमाणे म्हणजे 11 ऑक्टोबर 2005 अन्वये पात्र राहतील.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Cuttputlli Teaser:'कठपुतली'चा टीझर लाँच, अक्षय कुमार ...

Cuttputlli Teaser:'कठपुतली'चा  टीझर लाँच, अक्षय कुमार क्राइम थ्रिलर चित्रपटात माइंड गेम्स खेळताना दिसेल
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा पुढचा चित्रपट पपेट (कटपुतली) चा टीझर लाँच ...

प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफ क्लिनिकमध्ये ...

प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफ क्लिनिकमध्ये पोहोचली, विकी कौशलही होता सोबत
गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने चर्चा होत आहेत.मात्र, या ...

अभिनेत्री सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर केले हे गंभीर आरोप

अभिनेत्री सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर केले हे गंभीर आरोप
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्री सोमी अलीने ...

KWK 7कतरिना कैफ- विक्की देणार कॉफी विथ करण 7 मध्ये गोड ...

KWK 7कतरिना कैफ- विक्की देणार कॉफी विथ करण 7 मध्ये गोड बातमी !
अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. विमानतळावर ती ...

मॉर्डन सुनेची पूजा

मॉर्डन सुनेची पूजा
सासूबाई: अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे? नवीन मॉर्डन सुनबाई: मला ...