गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (22:10 IST)

अंकुर वाढवेचं मोठं यश, अपंग प्रवर्गातून एकमेव परीक्षाार्थी म्हणून उत्तीर्ण

कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरून हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर वाढवेचाही यात समावेश आहे.
 
अंकुर वाढवेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. अंकुर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अंकुरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.
 
त्यात त्यानं म्हटलं आहे की, ' सांगायला आनंद होत आहे की, अपंग प्रवर्गातून NET (नॅशनल एलिजिबल टेस्ट)२०२२ performing arts विषयामध्ये JRF घेऊन भारतातून एकमेव परीक्षाार्थी म्हणून मी पास झालो.अंकुरनं ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor