शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (16:40 IST)

मराठी अभिनेत्री आई होणार, व्हिडीओ शेअर केला

मराठी अभिनेत्री राधा सागर हिने एक सुंदर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. या व्हिडीओत तिने गरोदर असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. 
 
‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमध्ये राधाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून तिचं कौतुकही होत असतं. आता तिनने कामामधून ब्रेक घेतल्याचे कारणं खास असल्याचे कळून आलं आहे. सोशल मीडियावर आता तिचा गरोदरपणातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
 
राधाने पती सागरसोबत खास फोटोशूट केला आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे ज्यात ती खूप आनंदी दिसत आहे. यात तिने वेस्टर्न कपडे परिधान केलेले दिसत असून तिच्या चेहऱ्यावर छान असा ग्लो दिसून येत आहे. 
 
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
 
व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले की, “आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम चांगली बातमी जाहीर करण्याचा सर्वोत्तम दिवस. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा”.