1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2023 (15:16 IST)

हेमंत ढोमे आणि अनुजा साठेने शेअर केले एकमेकांचे सिक्रेट

hemant anuja
श्रेयस जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले. ट्रेलरवरून हा हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा सिनेमागृहात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसतेय. नुकत्याच या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांनी एका मुलाखतीदरम्यान एकमेकांचे कॉन्फिडेन्शिअल सिक्रेट शेअर केले आहेत. अनुजाला भरपूर खाण्याची सवय असल्याचे गुपित हेमंतने उघड केले आहे तर हेमंतच्या पोटात कोणतेही सिक्रेट राहात नसल्याचे सिक्रेट अनुजाने सांगितले आहे.
 
एकमेकांची पोल खोलण्याबाबत दोघांनी खुलासाही केला आहे. हेमंत ढोमे म्हणतो, '' अनुजा खूप खाऊ शकते. फिट राहण्यासाठी, दिसण्यासाठी अनुजा खूप कष्ट घेते, हे मला माहित आहे. परंतु ती जर एकदा खायला बसली तर ती भरपूर खाऊ शकते. हे मी स्वतः पाहिले आहे.'' तर अनुजा साठे म्हणते, '' हेमंत आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. तो वाईट नाही परंतु त्याच्या पोटात काहीच राहात नाही. एखाद्याचे सिक्रेट तो सिक्रेट ठेवूच शकत नाही. आज जर मी त्याला एखादी गोष्ट सांगितली तर रात्रीपर्यंत ती गोष्ट कोणालातरी सांगणारच आणि त्याची ही सवय कितीही केलं तरी न जाणारी आहे, हे तो स्वतः सांगतो.''
 
दरम्यान 'फकाट'च्या निमित्तानं हेमंत ढोमे पहिल्यांदाच एक मुस्लिम पात्र साकारत आहे. तर अनुजा साठे यात पाकिस्तानी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे यांच्याबरोबर सुयोग गोऱ्हे, रसिका सुनील,  अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.