शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (09:04 IST)

अभिनेते रमेश भाटकर कालवश, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Actor Ramesh Bhatkar kalwash
मराठीतील जेष्ट अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले आहे. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) अखेरचा श्वास घेतला असू, त्यांना कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले होते. प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांचे पुत्र होते. रमेश यांनी 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात काम करत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेह-यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच ते 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत देखील दिसले. रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'अश्रूंची झाली फूले' हे त्यांचे नाटक तर फार गाजले. केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.