बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (18:02 IST)

मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ग्राहकाने फसविले

मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये एका  ग्राहकानं हातचलाखीनं कॅशिअरकडून ४६ हजार रूपये काढून घेतले आहेत. हातचलाखीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. सदरच्या आरोपीने २ हजाराच्या त्या बंडलमधून २३ नोटा लंपास केल्या. त्यानंतर तेथून निघून गेला. उशीरा रात्री पैशांचा हिशोब सुरु असताना ही गोष्ट लक्षात आली.
 

हॉटेलमध्ये कॅशिअरकडून आरोपीने १००० यूएई करेंसी बदलण्याची मागणी केली. कॅशियरने चेंज देण्यास नकार दिला. कॅशिअरने म्हटलं की, तुम्ही या हॉटेलमध्ये राहत नाही आहेत म्हणून तुम्हाला चेंज देता येणार नाही. त्यानंतर या व्यक्तीने आपण यूएई नागरिक असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्याने २००० च्या नोटांचा बंडल पाहण्यासाठी मागितला.