बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (08:53 IST)

अभिनेत्री मिताली मयेकरने फोटो शेअर करताच झाली ट्रोल

अभिनेत्री मिताली मयेकर ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते.आता ही तिने अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. एवढेच नाही तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही त्या फोटोवर कमेंट केली आहे. मितालीने नुकतंच अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. त्यावर आता तिचा पती सिद्धार्थ चांदेकरने कमेंट केली आहे. काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना…अस त्याने म्हटलय. सिध्दार्थच्या या कमेंटनंतर चाहत्यांच्यानीही कमेंट केली आहे.
 
दरम्यान, सिद्धार्थने केलेल्या या कमेंटवर मितालीने “इशारा समज आणि परत ये” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मिताली मयेकर ही सध्या मध्यप्रदेशातील बांधवगड जंगल सफारीवर गेली आहे. या सफारी दरम्यान तीने हा फोटो शेअर केला आहे.
 
मितालीच्या पोस्टवर चाहत्यांनी टिकांचा पाऊस पाडला आहे. बाथरूम बांधता बांधता गवंडी पळून गेला… ते तसंच राहिलंय….,बेचारा सिद्धार्थ कस सहन करत असेल मितालीला, खट्टा मीठा मधला जॉनी लिव्हर रोडलोलर घेऊन यांचं बाथरूम पाडून फोटो काढून गेला वाटत, फोटोग्राफरला मानलं राव डेरिंग आहे भावाचं हात कपात असतील फोटो काढताना पण फोटोत दिसून नाही आलं तसकाही आणि मनावर ताबा समोरच दृश्य बगुन, लग्नात अलका कुबल वाटत होती लग्नानंतर अचानक दिपीका पदुकोन झालीस लग्न मानवलं अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor