सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. वारंवार नोटीस बजावूनदेखील कोर्टात हजर न राहिल्याने एक हजार रुपयांचा दंड आकारत ठाणे कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. फॅशन डिझाइनर जान्हवी मनचंदाने ठाणे कोर्टात प्राजक्ताविरोधात याचिका दाखल केली. मारहाण केल्याचा आरोप जान्हवीने प्राजक्तावर केला होता. तर दंडाधिकारी कोर्टातील खटल्याविरोधात प्राजक्ताने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
प्राजक्ताविरुद्ध मनचंदा मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. फॅशन शोदरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने केला आहे.