शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (13:32 IST)

अभिनेत्री सई ताम्हणकर हॉट फोटोशूट मुळे ट्रोल

sai tamhankar
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते. तिचा चाहत्यांचा वर्ग देखील खूप मोठा आहे. अलीकडील तिने हॉट फोटोशूट केले आणि त्यामुळे ती ट्रोल  देखील झाली. काहींनी तिला संस्कृती जपण्याचा सल्ला देखील दिला आहे. 

'नो एंट्री पुढे धोका आहे ' या मराठी चित्रपटामध्ये तिने बिकनी घालून चांगलीच चर्चा मिळवली होती. या पूर्वी मराठी चित्रपटात कोणीही बिकनी घातली नव्हती. या व्यतिरिक्त सई ने हिंदी चित्रपट हंटर मध्ये काही बोल्ड आणि हॉट सीन दिल्यामुळे देखील चर्चेचा भाग बनली. आता या फोटोशूट नंतर नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे. या हॉट फोटो शूट मध्ये तिने बिकनी सूट घातले असून पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे.

या फोटोवर नेटकरी कॉमेंट्स करत आहे. तिने 3 फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोशूटवर आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने अशक्य असे कॉमेंट्स केले आहे. तर हास्य जत्रा फेम नम्रता संभेराव आणि प्रार्थना बेहरेने देखील तिच्या फोटोची स्तुती केली आहे. तर दुसरी काही काही नेटकऱ्यानी तिला ट्रोल केले असून तिला संस्कृती जपण्यास सांगितले आहे. 
 
Edited by - Priya Dixit