गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (12:29 IST)

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री पती पासून घेणार घटस्फोट!

Photo- Instagram
Photo- Instagram
सध्या आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाह वर दररोज सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होत आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी पभुळकर ही साकारत आहे. सध्या ती तिच्या कामामुळे नसून तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मधुराणी पती पासून घटस्फोट घेण्याची चर्चा सुरु आहे.

तिने पती प्रमोद पभुळकर पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आपल्या पती सोबत असलेले सर्व प्रकल्प सोडले आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या पती सोबत सुरु केलेली अभिनय अकादमीचा राजीनामा दिला आहे. अशी माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली होती. 
 
मधुराणीच्या वैवाहिक जीवन सुरळीत सुरु नाही. त्यांना स्वराली नावाची एक मुलगी आहे. तिच्या आणि तिच्या पतीमध्ये दुरावा आल्यामुळे त्यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य केले नाही. 
 
 Edited by - Priya Dixit