शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (16:22 IST)

Niharika-Chaitanya Divorce : राम चरणच्या बहिणीचे लग्न मोडले,पती चैतन्यपासून घेतला घटस्फोट

instagram
Instagram
RRR फेम राम चरणची चुलत बहीण निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोन्नालगड्डा यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांनी गेल्या महिन्यात परस्पर घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि ही प्रक्रिया संपली आहे. त्यांच्या घटस्फोटाचे कारण अज्ञात असले तरी वैचारिक मतभेदांमुळे या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जाते.
 
निहारिका आणि चैतन्य यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा फेटाळली नाही. त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा पहिल्यांदा सुरू झाल्या जेव्हा त्यांनी इन्स्टाग्रामवरून लग्नाचे सर्व फोटो हटवले. आता हे अधिकृत झाले आहे की निहारिका कोनिडेला आता तिचा पती चैतन्य जोन्नालगड्डासोबत राहत नाही. ती आणि तिचे पती वेगळे राहत आहेत.  आणि निर्माते नागा बाबू यांची मुलगी निहारिकाने मार्च 2022 मध्ये तिचे इन्स्टाग्राम खाते निष्क्रिय करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता.
चैतन्य निहारिकाचा भाऊ वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या एंगेजमेंटमध्येही दिसला नव्हता. ज्यानंतर निहारिका कोनिडेला आणि तिचा नवरा घटस्फोट घेत असल्याच्या अफवा उडू लागल्या. दुसरीकडे, जेव्हा निहारिकाने तिचा भाऊ वरुणच्या एंगेजमेंटचे काही फोटो पोस्ट केले तेव्हा यूजर्सनी तिला चैतन्यच्या एंगेजमेंटला न येण्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.
 
डिसेंबर 2020 मध्ये लग्न झालेल्या निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोन्नालगड्डा यांच्यातील मतभेद अलीकडेच समोर आले. आपण एकाच छताखाली राहू शकत नाही हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
 







Edited by - Priya Dixit