शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (11:23 IST)

सुष्मिता सेनच्या भावाची संसाराची घडी विस्कटली

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम चारू असोपा अनेक दिवसांपासून पती राजीव सेन यांच्यापासून विभक्त होत असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी एकमेकांविरुद्ध अनेक विधाने जारी केली आणि चारूने राजीववर घरगुती हिंसाचार आणि इतर अनेक आरोपही केले. गेल्या वर्षीच सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर या जोडप्याने एकमेकांपासून वेगळे होणे चांगले मानले आणि कायदेशीर मार्ग स्वीकारला आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
 
राजीव आणि चारू यांचा 8 जून रोजी घटस्फोट झाला. होय दोघांच्या घटस्फोटाबाबत अंतिम सुनावणी झाली आणि त्यासोबतच त्यांचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला. एका मीडिया संस्थेच्या बातमीनुसार राजीव सेन यांनी सांगितले की आम्ही घटस्फोटित आहोत. घटस्फोटानंतर त्याने चारूसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
 
यासोबतच शेवटी आम्ही वेगळे झालो आहोत, असेही त्यांनी लिहिली आहे. राजीवने आपल्या नोटमध्ये लिहिले, "कुठलाही अलविदा नाही. फक्त दोन लोक जे एकमेकांना होल्ड करु शकलो नाहीत. प्रेम कायम राहील. आम्ही आमच्या मुलीसाठी नेहमीच आई आणि वडील राहू."
 
लग्नाला चार वर्षे पूर्ण होण्याच्या एक आठवड्यापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याने 16 जून 2019 रोजी गोव्यात लग्न केले होते. दोघांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीपासूनच त्यांच्यात मतभेद झाले होते, ज्यामुळे त्यांनी तो दिवस देखील साजरा केला नाही.
 
तरी दोघांनी लग्नाला अनेक संधी दिल्या, दरम्यानच्या काळात त्यांच्या घरी मुलगीही जन्माला आली, पण त्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. चारूने राजीववर घरगुती हिंसाचाराचे आरोपही लावले होते. यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडला. आज राजीव आणि चारू अखेर एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.