गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अजिंक्य देवचं मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन

ajinkya dev
मराठी चित्रपटसृष्टीचा गाजलेला अभिनेता अजिंक्य देव लवकरच ‘झोलझाल’ या चित्रपटात दिसणार आाहे. या आगामी मराठी चित्रपटात अजिंक्य देव ‘अभिमन्यू शिंदे’ या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण करणार्‍या अजिंक्य देव बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीत देखील आपली कमाल दाखवलेली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात सुद्धा तो महत्वाच्या भूमिकेत झळकला. 
 
इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्यामुळे अजिंक्य यांनी खूप काळापासून मराठीत चित्रपटात काम केले नव्हते. ‘झोलझाल’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एक चांगली भूमिका हाती आल्यामुळे चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अजिंक्य यांनी दिली. या चित्रपटातील अभिमन्यू या भूमिकेत विनोदी, गंभीर, तत्वनिष्ठ असे अनेक पैलू बघायला मिळतील. यात पुन्हा एकदा अजिंक्य अॅक्शन करताना दिसणार आहे.
 
मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ येत्या १ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.