गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:14 IST)

8 जुलैला झळकणार अमृता सुभाषची वेब सीरिज

amruta subhash
वेबसीरिजच्या जगतात आता ‘सास बहू अचाय प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची नवी सीरिज येत आहे. महिला दिनी झी 5 आणि टीव्हीएफने या सीरिजची घोषणा केली होती, या सीरिजचा ट्रेलर आता प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंह कार्की यांच्याकडून निर्मित या सीरिजचे दिग्दर्शन अपूर्व यांनीच केले आहे. 6 एपिसोड असणारी ही सीरिज 8 जुलै रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अमृता सुभाष हिच्यासह यामिनी दास, अनूप सोनी, अंजना सुखानी आणि आंनदेश्वर द्विवेदी हे कलाकार दिसून येणार आहेत.
 
या सीरिजची कहाणी जुन्या दिल्लीच्या चांदनी चौकच्या ऐतिहासिक गल्ल्यांमधील सुमन या व्यक्तिरेखेच्या भोवती घुटमळणारी आहे. लोणच्याचा व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारी महिला अमृता सुभाषने साकारली आहे. अनेक अडचणीनंतरही स्वतःची ओळख निर्माण करणाऱया महिलांना सलाम ठोकणारी ही कथा आहे. एक महिला खरी योद्धा असते असे उद्गार निर्माते अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंह कार्की यांनी काढले आहेत.