बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (20:59 IST)

अमृता सुभाष होणार आई?

amruta subhash
Instagram
‘झी मराठी’वाहिनीवरील ‘अवघाचि हा संसार’या मालिकेच्या माध्यमातून आसावरी म्हणजेच या मालिकेची नायिका अमृता सुभाष घराघरात पोहचली. सुरुवातीला नाटक, त्यानंतर मालिका, चित्रपट यातून अभिनेत्री अमृता सुभाष हिने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मराठमोळ्या नायिकेच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. अमृताच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. तिने सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त करत याबाबत माहिती दिली.
 
अमृता आणि दिग्दर्शक – अभिनेता संदेश कुलकर्णीचं लग्न 2003 मध्ये झालं. आता या दोघांच्या लग्नाला19 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृताने गोड बातमी दिली आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची प्रेग्नेंसी टेस्ट सकारात्मक आल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करुन अमृतानं लिहिलं, ‘ओह, द वंडर बिगिन्स’अमृताच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधले आहे. यासह एका गर्भवतीची इमोजीही तिने पोस्टद्वारे शेअर केली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच कलाक्षेत्रामधील मंडळीही कमेंटच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत.
 
तुम्हीही अमृताचं अभिनंदन करायचा विचार करत असाल, तर जरा थांबा. कारण अमृताने जरी ही पोस्ट टाकली असली तरी ती प्रेग्नन्ट नाही. तर ‘वंडर वूमन’चित्रपटात तिची भूमिका असलेली जया प्रेग्नन्ट आहे. ”ही बातमी ऐकल्यावर सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिल्या. पण मी नाही, तर जया प्रेग्नन्ट आहे”,अशी पोस्ट अमृताने केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील सगळ्याच अभिनेत्रींनी आपापल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून आपली प्रेग्नन्सी जाहीर केली आहे. आणि या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. थोडक्यात, ‘वंडर वुमेन’या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ही आयडिया करण्यात आली आहे.
 
अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस, किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘गल्ली बॉय’या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘सेक्रेड गेम्स – २’,‘बॉम्बे बेगम्स’आणि ‘सास – बहू आचार प्रा.ली’या वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

Edited by : Ratnadeep Ranshoor