सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (09:59 IST)

इंदापुरात मुलाने आईच्या डोक्यात ओंडका घातला , गुन्हा दाखल

crime
आईचे मुलावर आणि मुलाचे आईवर प्रेम असते. पण या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील इंदापूर तालुक्यात पळसदेव गावात घडली आहे. येथे  एका कलियुगी मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात लाकडाचा ओंडका घालून जखमी केले. वैजयंता जाधव असे या जखमी माउलीचे नाव आहे. पैशासाठी आपल्या आईला मारहाण केल्याचे समजले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
पुण्यातील इंदापूर तालुक्यात पळसदेव गावात राहणाऱ्या वैजयंता जाधव या माउलीने आपल्या मोठ्या मुलाच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी ची आहे. मुलाने पैशाची मागणी करत त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली आणि आईच्या डोक्यात थेट ओंडका घातला. मुलाने त्यांच्यावर वार केल्यावर त्या जमिनीवर कोसळल्या. वैजयंता यांचा मोठा मुलगा त्यांना पेंशनच्या पैशांसाठी छळायचा. 24 ऑक्टोबर रोजी मोठ्या मुलाने दमदाटी करत शिवीगाळ केली आणि ओंडका डोक्यात फेकून मारला. वैजयंता यांना 25 ऑक्टोबर रोजी चक्कर येऊ लागले आणि त्यांना धाकट्यामुलाने रुग्णालयात दाखल केले. वैजयंता यांनी पोलिसात मोठ्या मुलाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit