रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (11:44 IST)

जन्मदात्या आईकडून दोन मुलांची हत्या

crime news
नवी मुंबईमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका धक्कादायक प्रकारात घणसोली येथे एका आईने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर येत आहे. दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला असता यातून ती थोडक्यात बचावली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा गुर्जर (वय 32) असं आरोपी आईचे नाव असून मुलगी दिपू गुर्जर (4 वर्ष) आणि मुलगा राहुल गुर्जर (1 वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहे. पुष्पा गुर्जरचे पतीसोबत नेहमी कटकट-वाद होत असल्याने रागाच्या भरात रविवारी रात्री तिने टोकाचे पाऊल उचलले. आईने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.