1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:25 IST)

नागराज मंजुळेंच्या 'या' नव्या वेबसीरिजची घोषणा

Nagraj Manjule
नागराज मंजुळे यांची नवी कोरी वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने त्यांच्या आगामी वेब सीरिजची घोषणा केली आहे.
 
नागराज मंजुळे यांच्या या वेबसिरीजचे 'मटका किंग' असे नाव आहे. 19 मार्च रोजी मुंबईत प्राइम व्हिडीओचा भव्य इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये नागराज मंजुळेंच्या मटका किंग या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. अशताच या वेब सीरिजमधील कलारांच्या नावांची देखील घोषणा करण्यात आली.

या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मटका किंग या वेब सीरिजबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मुंबईतील एक कापूस व्यापारी मटका नावाचा जुगार खेळ सुरू करतो आणि शहराला घेरतो,” असे लिहिण्यात आले आहे.
 
विजय वर्माच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर,  डार्लिंग्स, जाने जान, पिंक, मर्डर मुबारक, गल्ली बॉय यासारख्या चित्रपटांंमध्ये काम केले आहे. त्याच्या ‘मिर्झापूर-3’ या वेब सीरिजला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यातील त्याच्या अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor