शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जानेवारी 2024 (10:51 IST)

बापल्योक’ अॅमेझॅान प्राईम व्हिडिओवर

आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने हे दोन मातब्बर दिग्दर्शक.   ‘बापल्योक’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे प्रस्तुकर्ते म्हणून उभे राहिले आणि ‘बापल्योक’ सारखा सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं ‘बापल्योक’ सारखी मनस्वी दमदार कलाकृती रसिकांपर्यंत  पोहोचावी यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचे चीज होताना दिसतेय. ‘बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. नावाजलेल्या  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'संत तुकाराम' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा तसेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण?, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंध्रप्रदेश तिरुपती, आपला बायोस्कोप, सिंधुरत्न पुरस्कार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविलेला ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ वर आला आहे.  
 
सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटांच्या या रंजक प्रवासात एका आनंददायी प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांना आता अनुभवता येणार आहे.  वडिल  मुलाच्या नात्याचे  मर्म सांगणारा आणि  ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेला 'बापल्योक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ वर पहायला मिळणार आहे. 
 
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ वर ‘बापल्योक’ हे आमच्यासाठीसुद्धा आनंददायी बाब आहे. मोठया पडदयावर चित्रपटाला जो  चांगला प्रतिसाद मिळाला तोच प्रतिसाद अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही मिळेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला. 
 
‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.