शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (13:38 IST)

दे धमाल अभिनेत्याचा साखरपुडा, स्पृहा जोशीच्या कमेंटने लक्ष वेधलं

बालकलाकार म्हणून कलाविश्वात पाऊल ठेवणार्‍या अभिनेता अनुराग वरळीकरचा त्याच्या मैत्रीण पायल साळवीबरोबर साखरपुडा झाला आहे. अनुरागने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. मराठी कलाविश्वातून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 
 
मात्र सगळ्या कलाकारांमध्ये स्पृहा जोशीच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्पृहा म्हणते, “सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे!! खूप खूप अभिनंदन अनुराग!” 
 
स्पृहा जोशीची ही कमेंट पाहून सर्वांना तिच्या आणि अनुरागच्या एका जाहिरातीची आठवण झाली आहे. या दोघांनी एका नामांकित विवाहसंस्थेच्या जाहिरातीत काम केलं होतं आणि यामध्ये “सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे!” असा डायलॉग खूप प्रसिद्ध ही झाला.
 
दरम्यान अनुराग वरळीकरच्या केवळ अभिनेता नसून दिग्दर्शक सुद्धा आहे. अनुरागने पोरबाजार, देवकी, बारायण अशा चित्रपटांमध्ये काम केलं असून काही महिन्यांपूर्वी त्याने डॉक्टर डॉन या मालिकेत श्वेता शिंदेच्या मुलाची भूमिका साकारली होती.