शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (11:23 IST)

सिनेइंड्रस्टीत सक्रिय राहण्यासाठी 'सीमा समर्थ' यांनी सोडली बँकेची नोकरी

अभिनेत्री सीमा समर्थ यांनी बँकेतील नोकरी सांभाळून 'बबन' या सिनेमात काम केले. मात्र त्यानंतर सिनेइंड्रस्टीत सक्रिय राहण्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरी सोडली. जुनी सांगवी येथील राष्ट्रीय बँकेच्या शाखा व्यवस्थापकपदी कार्यरत होत्या. अभिनयाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी बँकेची नोकरी सांभाळून 'बबन' सिनेमातील खेडे गावाची आजी साकारली. 'बबन'मधील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. 'बबन' या सिनेमानंतर त्यांनी बँकेतील नोकरी सोडून अभिनयाला पूर्ण वेळ देण्याचे ठरवले. लवकरच त्या 'हैदराबाद कस्टडी' या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहेत. यासोबतच सीमा सह्याद्रीवरील 'रुचिरा' या मालिकेचे सूत्रसंचालनही करत आहेत. त्यांच्या अभिनयाविषयीच्या आवडीबद्दल त्या सांगतात की, 'अभिनय ही माझी पहिली आवड आहे.

मात्र मी १९८१ सालापासून बँकेत कार्यरत होते. सुरूवातीला आकाशवाणी, दूरदर्शनवर छोटी मोठी कामे केली आहेत. मात्र चित्रपटात काम करण्याची संधी मला बबन चित्रपटातून मिळाली. बँकिंग क्षेत्रातील करियरमधून रिटायर होण्याच्या मार्गावर असताना भाऊराव कऱ्हाडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली. आता त्यांच्या 'बबन' चित्रपटानंतर पुन्हा एकदा मी त्यांच्या 'हैदराबाद कस्टडी' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला मेमध्ये सुरूवात होणार आहे. '