गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 29 मे 2019 (15:47 IST)

'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच दिवशी वाद

'बिग बॉस'चे घर म्हटले की भांडणे ही आलीच. 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमध्येदेखील भांडणे पाहायला मिळतील हे काही प्रेक्षकांसाठी नवे नाही. पण, रविवारी सुरु झालेल्या या सीझन 2 मध्ये पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली.
 
'बिग बॉस' 2 मध्ये कोण स्पर्धक असतील या प्रश्र्नाचे उत्तर रविवारी प्रेक्षकांना मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची ओळख करून दिल्यानंतर स्पर्धक घरात गेले. एकमेकांशी हळूहळू त्यांची ओळखही झाली आणि घरी एन्ट्री करून काही तास झालेले असतानाच घरात वादाची पहिली ठिणगी पडली. 'देवयानी' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि 'एमटीव्ही रोडीज'मधील मराठोळा चेहरा शिव ठाकरे या दोघांत खटके उडाले. शिवने मस्करी करत अभिजित बिचुकलेला शिवानीच्या नावाने चिडवल्यामुळे शिवानी भडकली. 'घरात असे चिडवाचिडवीचे प्रकार बंद कर' असे तिने शिवला सुनावलं... शेवटी घरच्यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवने तिची माफी मागितली.