गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (09:49 IST)

बिग बॉस मध्ये केव्हीआर ग्रुपचा दबदबा, कोण आहे या ग्रुपमध्ये

सध्या मराठीतील बिग बॉस जोरदार प्रेक्षक वर्ग मिळवत आहे. त्यामुळे त्या घरात  काय सुरु आहे हे सर्वाना माहिती पाहिजे असे झाले आहे. आता बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमाटीम सदस्य, भांडण याचबरोबर या बिग बॉसच्या घरात बनले जाणारे ग्रुप… बिग बॉस मराठी सिझन पहिला मध्ये देखील सई, पुष्कर आणि मेघा आणि त्यानंतर त्यांच्या ग्रुप मध्ये शर्मिष्ठाची भरती झाली होती. तर  ग्रुप मध्ये बरीच भांडण, वाद,गैरसमज झाले होते. तरीही ते एकत्र होते, मात्र हा  ग्रुप तुटतो कि काय अशी शंका देखील निर्माण झाली होती, पण तो ग्रुप तुटता तुटता वाचला… याचबरोबर रेशम, सुशांत, राजेश, आस्ताद यांचा ग्रुप देखील बराच चर्चेत राहिला होता. असो, आता बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला ग्रुप तयार होत असून, तो म्हणजे KVR – किशोरी शहाणे,विणा जगताप आणि रुपाली भोसले असा असणार आहे. त्यांच्या बरोबर त्यांनी गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे आणि त्याचे “KVR कट्टा” असे नावं दिले आहे. या नावाला किशोरी शहाणे यांनी संमती दिली आहे. या ग्रुप मध्ये अजून कोणाचा समावेश होईल ? या तिघींचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहील ? हे बघणे रंजक असणार आहे. मात्र या मालिकेचा टीआरपी जबरदस्त वाढतो आहे.