1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:33 IST)

भाई साठी मांजरेकर जाणार राज यांच्या कडे : राज आमचा खरा राजा - मांजरेकर

mahesh manjarekar
मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणे म्हणजे मोठा संघर्ष आहे. कोणताही सिनेमाग्रह मालक लवकर हे सिनेमे लावत नाही त्यामुळे अनेकदा संघर्ष उभा राहतो, आता असाच संघर्ष महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘भाई : व्यक्ती की वल्ली’हा चित्रपट उद्या म्हणजेच ४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तेव्हा पुन्हा एकदा चित्रपटाला मुंबई-पुण्याच्या सिंगल स्क्रिन थिएटर मालकांनी स्क्रिनिंग देण्यास नकार दिला असून, त्यामुळे संतप्त झालेले दिग्दर्शक महेश मांजरेकर खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्रिनिंग मिळत नाही. ही एक लाजिरवाणी बाब आहे.महाराष्ट्रीन असल्याची लाज वाटते असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले आहेत.  त्याचबरोबर राज ठाकरेच आमचा खरा राजा असल्याचे मांजरेकर यावेळी म्हणाले आहेत.
 
राज यांच्या कडे जाणार मांजरेकर 
 
‘भाई : व्यक्ती की वल्ली’या चित्रपटाला स्क्रिनिंग न मिळण्यावर तुम्ही राज ठाकरेंकडे जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर मांजरेकर म्हणाले की, खरतर मला खळखट्याक करायची इच्छा नव्हती.मात्र राज ठाकरे आमचा खरा राजा आहे. तोच आमच्यासाठी खर्या अर्थाने लढत असून, त्यातून मार्ग निघेल असे महेश मांजरेकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर या विषयी आपण महाराष्ट्राचे सासंस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या विषयी चर्चा केल्या असल्याचेही मांजरेकर यांनी सांगितले.