शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:21 IST)

‘भाई’चित्रपटाला स्क्रीन मिळायला तयार नाही

The 'Bhai' film is not ready to get the screen
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’चे मुंबई आणि उपनगरातील जवळपास ११८ मिल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर शो सुरू आहेत. मात्र ४ जानेवारील प्रदर्शित होणाऱ्या ‘भाई’चित्रपटाला महाराष्ट्रातील दोन्ही महत्त्वाच्या शहरात  चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झाली आहे. मुंबई- पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरातील स्क्रीन मालकांनी हा चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. दक्षिण मुंबईतील १८, पश्चिम मुंबईत २० आणि नवी मुंबईतील ७ अशा एकूण ४५ चित्रपटातगृहात ‘भाई’चे शो आहेत हा आकडा‘सिम्बा’ला देण्यात येणाऱ्या स्क्रीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. पुण्यातही हेच चित्र आहे. पुण्यातील एकूण २१ हून अधिक मिल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर‘सिम्बा’चे वेगवेगळ्या वेळेत शो ठेवण्यात आले आहेत. तर ‘भाई’साठी हा आकडा कमी आहे पहिल्याच दिवशी १९ आणि मग १७ चित्रपटगृहात ‘भाई’दाखवण्यात येणार आहे.