गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (13:49 IST)

रिंकू राजगुरू बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा (HSC) निकाल 28 मे म्हणजे आज जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. तर सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील बाजी मारली आहे. 
 
रिंकूने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या परीक्षेत रिंकू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला 82 टक्के गुण मिळाले आहेत. 
 
रिंकूने टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून 12 वीची परीक्षा दिली होती. ती नियमित कॉलेजला जात नव्हती म्हणून तिने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली होती. 
 
कला शाखेतून परीक्षा देताना तिचे मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय होते.