गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (17:09 IST)

'बाबू'च्या चित्रीकरणाला सुरुवात

'बाबू' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले असून बाबू के. भोईर निर्माता आहेत. या चित्रपटाचे मुंबईमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून ‘बाबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की. अनेक हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या अंकित मोहनसोबत या चित्रपटात नेहा महाजन, रुचिरा जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे येत्या काळात 'बाबू' चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार यात शंका नाही.