बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (13:45 IST)

भाऊ कदमचा पांडू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला,चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके अभिनित पांडू हा चित्रपट येत्या ३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे .हा चित्रपट झी स्टुडियोची निर्मिती असून चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके सारखे हुरहुन्नरी विनोदी कलाकारांच्या या जोडीसह सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, प्रवीण  तरडे आणि प्राजक्ता माळी या चित्रपटात असणार. या चित्रपटाची कथा आहे  दोन मित्रांची पांडू आणि महादू हे दोघे मित्र कोल्हापुरात राहतात. त्यांना मुंबईत हवालदाराची नौकरी करण्याची संधी येते . ते दोघे संधीचे सोने करण्यासाठी मुंबईत येतात आणि त्यानंतर त्याच्या मुंबईतील प्रवास पांडू हा सरळ भोळा भाबडा असतो तर महादू हा त्याच्या विपरीत चाणाक्ष ,चतुर असतो. मुंबईत भोळाभाबडा पांडूच्या प्रेमात मुंबईत केली विकणारी उषा पडते. आणि पुढे काय होत हे येत्या ३ डिसेंबरला कळेल. आज या चित्रपटाचे टिझर रिलीझ झाले असून. लोकांना हसवणारा हा चित्रपट येत्या ३ डिसेम्बरला राज्यात  प्रदर्शित होत आहे