बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (16:05 IST)

बोगदा

'बोगदा' या सिनेमाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केले आहे. स्त्रीव्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या या सिनेमाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ' स्त्रीप्रधान भूमिकेवर मराठीत कमी सिनेमे बनले आहेत. त्यामुळे बोगदा या सिनेमात मी स्त्रीव्यक्तिरेखाला अधिक महत्व दिले आहे. जगातल्या प्रत्येक आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा असून, त्यांचे मतभेद आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची नाजूक गुंफण या सिनेमात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे'. इतकेच नव्हे तर, आशयसमृद्ध कलाकृतीने परिपूर्ण असलेल्या 'बोगदा' सिनेमाला 'व्हीस्लिंग वूड'च्या शिलेदारांचा मोठा हातभार लाभला आहे.
 
प्रस्तुती - नितीन केणी
निर्माता - सुरेश पानमंद, नंदा पानमंद, कारण कोंडे, निशिता केणी
दिग्दर्शन, कथा व संवादलेखन  - निशिता केणी
छायाचित्रण - प्रदिप विग्नवेळू
संकलन -  पार्थ सौरभ
गीतकार - विशाल दादलानी, साशा तिरुपती (बंजारा) सिद्धार्थ शंकर महादेवन (झुंबड)
संगीत - सिद्धार्थ शंकर महादेवन, सौमील श्रींगारपुरे
गीत लेखन - मंदार चोळकर
कार्यकारी निर्माता- रत्नकांत जगताप
नृत्य दिग्दर्शन - दिपाली विचारे
कला दिग्दर्शन - महेश कोरे
ध्वनीचित्रण - कार्तिक
 
कलाकार
 
मृण्मयी देशपांडे - तेजस्विनी 
सुहासिनी जोशी - तेजस्विनी आई 
रोहित कोकाटे - किशोर