शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:48 IST)

'बॉईज'ची नाबाद पन्नाशी

boys marathi cinema
'आम्ही लग्नाळू' म्हणत तरुणाइंच्या मनात धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'बॉइज' सिनेमाला नाबाद ५० दिवस पूर्ण झाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले असले तरी, युथने डोक्यावर उचलेला हा सिनेमा आजही सिनेमागृहात हाउसफुल पाहिला जात आहे. 'बॉईज' ची रंगीत दुनिया मांडणाऱ्या या सिनेमाचे महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये १५०० हुन अधिक शोज सुरु आहेत. एव्हढेच नव्हे, तर त्याची ख्याती सिंगापूरपर्यत पसरली असून, तेथील स्थानिक मराठीभाषिक प्रेक्षकांच्या विशेष मागणीमुळे 'बॉईज' सिनेमाचे खास स्क्रीनिंग सिंगापूरमध्ये ठेवण्यात आले होते.