गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:24 IST)

स्त्री शक्तीच्या दैवी अवतारांच्या उपासनेच्या नव-रात्रीची सकाळ आमच्यासोबत साजरी करा !

natak
जिथे मिथकीय रूपांच्या पलीकडे जीवनाच्या वास्तवाला जगणारी, भेदणारी स्त्री आपल्याला या पितृसत्ताक, सरंजामशाही आणि बाजार-व्यापाराच्या खरेदी विक्रीच्या चक्रव्यूहाला भेदत मानवी, सन्मान आणि समतेची मशाल हाती धरून एक शांतीप्रिय, मानवीय,  अहिंसात्मक, न्यायसंगत, समतामूलक समाजाच्या निर्माणाचा मार्ग दाखवते !
 
थिएटर ऑफ रेलेवन्सचे शुभचिंतक आणि प्रयोगकर्ते समता, बंधुता आणि शांततेचा संकल्प करीत ' महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा व वैचारिक प्रगतीशीलतेचा' वारसा जगणारे,रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटक "लोक-शास्त्र सावित्री"  8 ऑक्टोबर 2022, शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता, सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली, येथे प्रस्तुत करणार आहेत !
 
कलाकार: अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, नृपाली जोशी, संध्या बाविस्कर, आरोही बाविस्कर, तनिष्का लोंढे आणि प्रीती कोचरेकर अन्य कलाकार.
 
रंगभूमी ही समता, बंधुता आणि शांतीची पुरस्कर्ती असावी, परंतु असे होत नाही. रंगभूमी ही केवळ सत्तेच्या वर्चस्वाचे माध्यम बनली आहे आणि रंगकर्मीं त्यांचे कठपुतली बनले आहेत जे रंगभूमीच्या मूळ उदग्माच्या विरोधात आहे.कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे. मानवतेसाठी व विश्वाच्या कल्याणासाठी सृजन करणारा सृजनकार काळासोबत लढतो. आपला नवीन काळ निर्माण करतो. "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाटयसिध्दांताचे "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक युगपरिवर्तनाचा काळ रचते. 
natak
स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता. सावित्री बाईंनी पितृसत्ता, सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. त्यांनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ? 
 
जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
 
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.
 
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे. 
 
मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक  नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’लढत आहे ! 
 
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी : 
लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स”नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट8 जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.
Tushar Mhaske

Published By -Smita Joshi