गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (11:49 IST)

विजयाचा उत्सव म्हणून करू साजरी आम्ही विजयादशमी

dussara
करुनी निःपात राक्षसांचा, केलेस सीमोल्लंघन,
विजय पताका उभारली, करुनी तुज वंदन,
कोमल हृदय तुझं ग माते, पर तू घेतलं उग्ररूप,
माजलेल्या दैत्याना दविले अमोघ शक्तीचे स्वरूप,
विजयाचा उत्सव म्हणून करू साजरी आम्ही विजयादशमी,
दुष्ट प्रवृत्तीचा करू संहार, घेऊ प्रेरणा आम्ही,
असच प्रकट होतं जावं तुम्ही, नायनाट कराया,
धजणार न कोणी दैत्य, वाकडं पाहाया!!
अगणित दुष्ट दानव चहूबाजूंनी दिसतात,
शील नारीचे अमानवीय पायी तुडवतात,
ये झडकरी धावून तू, दे शक्ती प्रबळ आम्हास ,
देऊ शकू तत्काळ शिक्षा असल्या अपऱ्याध्यास!
...अश्विनी थत्ते
Published  by: Smita Joshi