शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 29 जून 2021 (12:56 IST)

स्टोरीटेलवरील जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी लिखित चेकमेट या कथेला रसिकांची पहिली पसंती...

स्टोरीटेल हा ऍप कथा, कादंबरी व अनेक पुस्तकांसाठी प्रचलित झाला आहे. नव्या युगाची चाहूल लक्षात घेता उत्तमोत्तम साहित्य ऑडिओ फॉर्मेटमध्ये उपलब्ध करुन देऊन स्टोरीटेल रसिकांची साहित्यिक भूक मिटवत आहे. त्याच बरोबर स्टोरीटेल ओरिजिनल्सच्या माध्यमातून नवीन कथा, कादंबरी सुद्धा घेऊन येत आहे. ही कथा नंबर १ वर ट्रेंड होत आहे.
 
सध्या स्टोरीटेलवर जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी लिखित चेकमेट ही दीर्घ कथा पहिल्या क्रमांकावर आहे. १७ जून २०२१ ला प्रदर्शित झालेली ही कथा थोड्याच वेळात वाचकांच्या पसंतीस पडली आहे. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान हे या कथेचं प्रमुख पात्र आहे.
 
याविषयी आपलं मांडताना लेखक जयेश मेस्त्री म्हणतो, "चेकमेट लिहिताना आमच्यासमोर सर्वात मोठं चॅलेन्ज होतं ते अभिमन्यूचं. अभिमन्यू म्हणा, त्याची फियान्से रेणुका किंवा कॉन्स्टेबल पाटील, फॅरेन्सिक लॅबचे डॉ. सिब्बल... या सर्वांचे कॅरेक्टर्स मर्डर केसमध्ये डेव्हेलप झाले होते. मर्डर केसला जो प्रतिसाद मिळाला, तो खाली पडू द्यायचा नव्हता. रसिकांना नाराज करायचं नव्हतं. म्हणून आम्ही खूप काळजी घेतली. प्रत्येक सीन्समध्ये प्लॉट पॉइंट्स येतील, थ्रिल निर्माण होईल याची दक्षता घेतली. आणि खरं सांगायचं तर खूप मजा आली. अभिमन्यूवर लोकांनी खूप प्रेम केलं. आस्ताद काळेने सुद्धा कथा उत्तमरित्या नरेट केली आहे."
 
चेकमेट ही कथा तुम्ही या लिंकवर ऐकू शकता: https://www.storytel.com/in/en/books/2480467-Checkmate?appRedirect=true
 
मर्डर केस ही ५ एपिसोड्सची कथा खूप यशस्वी झाली. लोकांनी अनेक डिटेक्टिव्ह कथा वाचल्या आहेत, पण अभिमन्यू हा अजच्या युगाचा प्रतिनिधी आहे. मुंबई पोलिसात असणारा अभिमन्यू प्रधान बॅटमॅनप्रमाणे आपल्या शहराला वाचवण्यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतो. कथेचा लेखक श्रीपाद जोशी यावर म्हणतो की "आपण फिल्म्समध्ये पाहतो की व्हिलन्स खूप मोठा असतो. पण प्रत्येकामध्ये एक व्हिलन असतो, हिरो असतो, सपोर्टिंग कॅरेक्टर असतो. चेकमेट किंवा अभिनम्यूची कोणतीही सीरीज म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या कॅरेक्टर्सचं व्यक्तिचित्रणच आहे. म्हणून आम्हाला वाटतं की त्यांना चांगलं आणि रियलिस्टिक व्यक्तिचित्रण ऐकायला मिळेल, क्राईमच्या एका वेगळ्य़ा दुनियेत प्रवेश करता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असे काही गुन्हा आपल्या अवतीभोवती घडतात, त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे हेही लक्षात येईल. आणि अफकोर्स एंटरटेनमेंट... प्रत्येक क्षणाला थ्रिल अनुभवता येईल आणि हे दीड तास यंग, डॅशिंग, हॅंडसम अभिमन्यू प्रधानसोबत घालवता येईल. लोकांनी या अभिमन्यूला डोक्यावर घेतलं यासाठी मी त्यांचा आभारी आहे."

-जयेश मेस्त्री