शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (14:57 IST)

डॅनी सिंग देणार 'देसी हिप हॉप' अल्बममधून 'रॅपसॉंग'चा देसी तडका

पाश्चिमात्य देशातून आलेल्या ‘रॅप’ गाण्यांचा तडका भारतातदेखील मोठ्याप्रमाणात गाजत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या तरुणाईला आपल्या 'बिट्स' वर थिरकवणा-या या रॅपर्सच्या यादीत डॅनी सिंग याचेदेखील नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी-पंजाबी फ्युजन असलेल्या त्याच्या रॅपसॉंगला तरुणाईकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याकारणामुळे. डॅनी आपल्या चाह्त्यांसाठी लवकरच 'देसी हिप हॉप' हा अल्बम घेऊन येत आहे. ह्या अल्बममध्ये पश्चिमात्य संगीताचा बाज जरी असला तरी, अस्सल देसी तडकाचा वापर करण्यात आला आहे. डॅनीचे यापूर्वी 'दारू पिने दे' हे गाणे देखील चांगलेच गाजले होते. त्या गाण्याला सोशल मीडियावर वन मिलियन्स व्हीव्यूज लाभले असून, मराठी- हिंदी फ्युजन असलेले "आयटमगिरी" हे रॅप सॉंगसुद्धा तरुणाईच्या चर्चेचा विषय ठरला होता.   

'देसी हिप हॉप' या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. लवकरच हा अल्बम बाजारात उपलब्ध होणार असून सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या इतर गाण्याप्रमाणे, हि गाणी तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडतील, असा अंदाज आहे.