बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (10:54 IST)

'कुछ मीठा हो जाए' च्या पहिल्या प्रयोगाला मिळाली प्रेक्षकांच्या पसंतीची

निर्माते डी एस पाहवा ह्यांच्या सहयोगाने  प्रख्यात दिग्दर्शक रमण कुमार परतले आहेत एक नवीन भावनात्मक उतार चढाव असलेली कलाकृती 'कुछ मीठा हो जाए' घेऊन, काल ह्या नाटकाचा शुभारंभ झाला. आई आणि मुलीच्या निर्मळ नात्यावर लिखित ह्या नाटकाच्या प्रमुख भूमिका प्रख्यात अभिनेत्री सुधा चंद्रन आणि रिद्धिमा राकेश बेदी यांनी साकारल्या आहेत. तर पेंटल, अवतार गिल, रवी गोसाईन, पूजा राजपूत आणि हर्षिता शुक्ल यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. 
 
"ही कलाकृती एक गोड भावनात्मक नात्याचे कथन करते जे काही कारणास्तव कटू झाले आहे. या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाने प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओव्हेवेशन मिळवले ह्याचा आम्हाला आनंद आहे", निर्माता डी एस पाहावा व्यक्त झाले. निर्मात्यांस साथ देत दिग्दर्शक रमण कुमार म्हणाले  की, "आई आणि मुलीच्या नात्यात घडत असलेल्या ह्या भावनात्मक उथळ-पुथळ कलाकृतीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असल्याचे हे प्रमाण होते."
बांद्रा येथील रंग शारदा नाट्यगृहात ह्या नाटकाचा शुभारंभ झाला, अभिनेता अवतार गिलने दिनेश कुमार उर्फ डीके ची भूमिका साकारली आहे जो सागरिकाची भूमिका साकारत असलेल्या सुधा चंद्रन यांचा मित्र आहे. अभिनेता पेंटल यांनी सागरीच्या घनिष्ट आणि प्रामाणिक तबलावादक मित्राची तर रवी गौसेन यांनी रिधीमाच्या पतीची भूमिका बजावली आहे. रिधिमा यांनी मुलीची भूमिका साकारली, जी तिच्या आईला आपल्या वडिलांच्या मद्यपान व्यसनात अडकलेल्या आणि त्यांच्या अचानक अनपेक्षित आणि अप्राकृतिक मृत्यू झालेल्या ह्या घटनेचा दोषी मानते. प्रेक्षकांनी ह्या नाटकाच्या प्रदर्शन आणि संवादाचे भरभरून कौतुक केले.
 
डी एस पाहवा यांच्या भारतीय मनोरंजन उद्योगाबरोबरचा संबंध ७०वर्षांपासूनच आहे, जेथे दिल्लीतील सिनेमागृह चालवण्यापासून त्यांनी ४० हिंदी चित्रपट वितरीत केले होते. चित्रपट वितरणाव्यतिरिक्त, डी एस पाहवा यांनी अनेक बॉलीवुड व्यक्तित्वांसोबत समीक्षकांची प्रशंसनीय नाटकं केली आहेत.
 
रंग शारदामध्ये सादर झालेल्या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर आता 'कुछ मीठा हो जाए' ची संपूर्ण टीम ऑपेरा हाऊस मध्ये होण्याऱ्या पुढच्या प्रयोगासाठी सज्ज आहे. यानंतर देशभरात ह्या नाटकाचे  दौरे सुरू होतील.